– जिल्हादंडाधिकारी के.मंजुलक्ष्मी
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात होणाऱ्या धार्मिक सण उत्सव, आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने विविध राजकीस पक्षाचे पुर्वतयारी निमित्त होणारे कार्याक्रम त्याचप्रमाणे वैयक्तिक मागण्यांकरिता उपोषण, मोर्चा, निदर्शने, रास्ता रोको यासारखी आंदोलने सुरळीत पार पाडून कोठेही अनुचित प्रकार घडू नये. जिल्ह्यात जातीस सलोखा, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्व भूभागात महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (अ) 4 ते (फ) आणि 37 (3) प्रमाणे दि. 28 फेब्रुवारी ते 14 मार्च 2021 अखेर मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.
या मनाई आदेशाचे उल्लंघन झाल्यास महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 135 नुसार शिक्षेस पात्र राहील. याची जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.