You are currently viewing या ना राया

या ना राया

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लावणी*

 

**या ना राया** 

 

वाट पाहुनी दमले मी तर

कुठे तुम्ही गुंतला

लवकर या हो या ना राया

जवळी घ्या ना मला

अहो राया या ना

जवळी घ्या ना मला ।।धृ।।

 

संध्या झाली तांबुस पिंगट

कंकणांनी मी भरले मनगट

वाहत आहे उधाण वारा

उगा स्पर्शुनी जातो नटखट

विळखा तुमच्या करकमलांचा

हळूच द्या ना मला ।।१।।

 

रातकिड्यांची किरकिर झाली

रात्र ही आता भरात आली

तहान माझी मस्त भागवा

नथ ही माझी धुसफुसलेली

श्वासामध्ये श्वास मिळू द्या

लावा तुमचा लळा ।।२।।

 

चैत्री पालव फुटु लागली

उरी भावना साठु लागली

दाटुन येता आठवण तुमची

चोळी राया उसवू लागली

माझ्या नजरेमध्ये तुमच्या

खूप दाटल्या कला ।।३।।

 

*©कविवर्य वैद्यराज भूपाल देशमुख.*

बुर्‍हानपूर

9823219550/8888252211

प्रतिक्रिया व्यक्त करा