You are currently viewing मदर क्वीन्सच्या विद्यार्थ्यांनी घेतले जुदो ,कराटे ,बॉक्सिंग चे धडे!

मदर क्वीन्सच्या विद्यार्थ्यांनी घेतले जुदो ,कराटे ,बॉक्सिंग चे धडे!

मदर क्वीन्सच्या विद्यार्थ्यांनी घेतले जुदो ,कराटे ,बॉक्सिंग चे धडे!

सावंतवाडी

सिं. जि. शि. प्र.मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी, या प्रशालेत दिनांक 20 व 21 एप्रिल 2026 रोजी ज्युदो ,कराटे व बॉक्सिंग प्रशिक्षण संपन्न झाले.

प्रशिक्षक श्री दिनेश जाधव यांनी वॉर्म अप टेकनिक, ब्लॉक टेकनिक ,सिट अप्स ,डिफेन्स टेकनिक इत्यादीचे प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण दिले. तसेच स्व-संरक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले .त्याचप्रमाणे बॉक्सिंग या क्रीडाप्रकाराबद्दल माहिती दिली तसेच या विविध क्रीडा प्रकारात असलेल्या व्यावसायिक संधींबद्दल देखील मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे शरीर तंदुरुस्त राखण्यासाठी प्रथिनयुक्त आहार ,पालेभाज्या इत्यादींचा रोजच्या आहारात समावेश करण्याबद्दल देखील मार्गदर्शन केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. अनुजा साळगांवकर यांनी विद्यार्थ्यांना स्व-संरक्षणाची उपयुक्तता स्पष्ट केली व सातत्यपूर्ण प्रशिक्षण घेण्याचे आवाहन केले. यावेळी संस्थेचे सदस्य श्री. जयप्रकाश सावंत यांच्या हस्ते प्रशालेतर्फे श्री. दिनेश जाधव यांना स्नेहभेट देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. श्रुती जोशी व श्रीम. प्रणिता मयेकर यांनी केले.
या शिबीरासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,डॉ.सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगावंकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा