You are currently viewing मालक घ्या की दमानं

मालक घ्या की दमानं

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम लावणी*

 

*मालक घ्या की दमानं* 

 

मालक..,अहो…मालक…

मालक घ्या की दमानं जरा बसा की गुमान

पारखून घ्या हिरा राजसा ठेवा की जरा मान ||धृ||

 

येऊद्या की पलीकडून इश्काचं आवतन

नका काढू तुमच्या मर्जीचं आगाऊ फर्मानं

धोका दिसतो प्रेमात रहा थोडं सावधान

पारखून घ्या हिरा राजसा ठेवा की जरा मान ||१||

 

बाई कुठली कशी फसली घावलं कुठलं ठाणं

इशारा कसा जाळं टाकतोय ठेवा नजरेचं भानं

अडकाल पिंजऱ्यात होऊन नशेत बेभान

पारखून घ्या हिरा राजसा ठेवा की जरा मान ||२||

 

तुमचा अर्ज तुमचा फर्ज निभवा नेटानं

केस तुमची तुमचंच कोर्ट घ्या सांभाळून

निकाल लावा निवाडा करा सत्याच्या बाजूनं

पारखून घ्या हिरा राजसा ठेवा की जरा मान ||३||

 

कवी :-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

७५८८३१८५४३.

८२०८६६७४७७.

प्रतिक्रिया व्यक्त करा