You are currently viewing अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर माधव बुक सेंटरचे नव्या जागेत दिमाखात उद्घाटन

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर माधव बुक सेंटरचे नव्या जागेत दिमाखात उद्घाटन

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर माधव बुक सेंटरचे नव्या जागेत दिमाखात उद्घाटन

७० वर्षांची परंपरा जपत घोणसरी रोडवर नवे रूप; मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात सोहळा

कणकवली

घोणसरी रोड येथे ७० वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या माधव बुक सेंटरचे नव्या जागेत व नव्या रूपात उद्घाटन अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला सरपंच संजना आग्रे, उपसरपंच तन्वी मोदी, एसबीआयचे मॅनेजर श्री. पप्पू गुप्ता, डॉ. शैलेद्र आपटे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी श्री. नांडोस्कर यांनीही भेट देत शुभेच्छा दिल्या, तर निवृत्त एसटी कंडक्टर बाळा लाड यांनीही उपस्थित राहून आनंद व्यक्त केला.
माधव बुक सेंटरचे मालक अजित नाडकर्णी यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे व ग्राहकांचे आभार मानले. गेल्या ७० वर्षांपासून मिळत असलेले लोकांचे प्रेम असेच कायम राहावे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा