मालवणात शिवजयंतीनिमित्त सत्यनारायण महापूजा उत्साहात
माजी आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती; शिवसेना उबाठा कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग
मालवण :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मालवण शाखेत प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही शिवजयंतीनिमित्त सत्यनारायण महापूजेचे आयोजन भक्तीभावाने करण्यात आले. या कार्यक्रमाला कुडाळ-मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.
या प्रसंगी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, महिला आघाडी संघटक दिपा शिंदे, शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, नगरसेविका अनिता गिरकर, माजी नगरसेवक महेश जावकर, उपशहरप्रमुख हेमंत मोंडकर, युवतीसेना जिल्हाप्रमुख मिनाक्षी शिंदे, युवतीसेना तालुका संघटक भाग्यश्री लाकडे खान, पायल आढाव, उपशहरप्रमुख सदा लुडबे, प्रमोद करलकर, पूजा करलकर, चिंतामणी मयेकर, दिपा जावकर, पोईप उपविभागप्रमुख समीर लाड, किशोर गावकर, सुरेश मडये आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात धार्मिक वातावरणात पूजा पार पडली असून शिवजयंतीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
