*ग्राहक पंचायतची कुडाळ येथे जिल्हास्तरीय कार्यशाळा*
वैभववाडी
ग्राहक केंद्रबिंदू मानून कार्य करणाऱ्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते
यांच्यासाठी एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यकर्ता प्रबोधन कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. संस्थेचा कार्यकर्ता म्हणून समाजातील ग्राहकांच्या विविध प्रकारच्या समस्या सोडवित असतांना संस्था, संस्थेची कार्यपद्धती, ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहक न्यायालये, प्रशासन कार्यप्रणाली याची माहिती कार्यकर्त्याला होणे आवश्यक आहे. कार्यकर्ता स्वतः सजग व सक्षम व्हावा यासाठी अशा
कार्यशाळांचे जिल्हानिहाय आयोजन करण्यात येते.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग,सिंधुदुर्ग जिल्हा शाखा आणि तालुका शाखा कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार दिनांक २३ एप्रिल रोजी कुडाळ येथे एक दिवसीय जिल्हास्तरीय ग्राहक कार्यकर्ता प्रबोधन कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यशाळेला ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी व काही शासकीय अधिकारी वर्गांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.
या कार्यशाळेची सविस्तर रूपरेषा लवकरच जाहीर करण्यात येईल असे ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने कळविले आहे.
