रविंद्रजी चव्हाण यांच्याकडून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला एक लाखांची मदत
सावंतवाडी :
शहरातील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान हे केवळ एक नाव न राहता निस्वार्थी सेवाभावी कार्याची ओळख बनले असून, त्यांच्या कार्याची दखल आता वरिष्ठ नेते व मान्यवरांकडून घेतली जात आहे.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण यांनी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानसाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. ही रक्कम सन्माननीय विनोदजी राऊळ यांच्या हस्ते प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिका सेवेसाठी तसेच इतर सामाजिक उपक्रमांसाठी देण्यात आली.
यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे, उपाध्यक्ष प्रा. शैलेश नाईक तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विनोदजी राऊळ उपस्थित होते.
या मदतीबद्दल सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांकडून रविंद्रजी चव्हाण तसेच विनोदजी राऊळ यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
