फोंडाघाट कॉलेजमध्ये रामनवमी रील स्पर्धेचा बक्षीस समारंभ उत्साहात
तरुणांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न – संजय आग्रे; मान्यवरांची उपस्थिती, विजेत्यांना रोख पारितोषिके
फोंडाघाट
श्रीरामनवमी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या रील स्पर्धेचा बक्षीस समारंभ फोंडाघाट कॉलेजच्या सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला शिवसेना गटनेते संजयजी आग्रे, चेअरमन राजू पटेल, रंजन नेरुरकर, सरपंच संजना आग्रे, माजी खजिनदार अजित नाडकर्णी, संदेश पटेल, अण्णा लिंगरस तसेच कॉलेजचे प्राचार्य व सर्व स्टाफ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी बोलताना संजय आग्रे यांनी, “स्थानिक मुलांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबवला आहे,” असे सांगितले. रंजन नेरुरकर यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत अशा स्पर्धा सातत्याने घेण्याची गरज व्यक्त केली.
संदेश पटेल यांनी पुढील वर्षी यापेक्षा मोठ्या प्रमाणावर रामनवमी साजरी करण्याचे आवाहन केले. अजित नाडकर्णी यांनी शुभेच्छा देताना संजय आग्रे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत भविष्यात मोठे नेतृत्व घडावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सरपंच संजना आग्रे यांनीही स्पर्धकांना प्रोत्साहन दिले.
यावेळी संजय आग्रे यांच्या कन्येनेही प्रभावी भाषण करून उपस्थितांची दाद मिळवली. तसेच अजित नाडकर्णी यांनी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर नवीन ठिकाणी ‘माधव बुक सेंटर’ सुरू करत असल्याची माहिती देत सर्वांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.
स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात आली, तर इतर सर्व स्पर्धकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
