You are currently viewing शिरोडा येथे उद्या होणार भव्य “सकल हिंदू संमेलन”

शिरोडा येथे उद्या होणार भव्य “सकल हिंदू संमेलन”

शिरोडा येथे उद्या होणार भव्य “सकल हिंदू संमेलन” : मान्यवरांचे मार्गदर्शन

माऊली मंदिर पासून निघणार पारंपारिक मंगल वेशभूषेत भव्य शोभायात्रा

वेंगुर्ले : प्रतिनिधी

धर्म, परंपरा, संस्कृती व मूल्याचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी सकल हिंदू संमेलन समिती शिरोडा मंडल म्हणजे शिरोडा पंचक्रोशी ने शिरोडा येथील गुरूवर्य वि.स.खांडेकर विद्या प्रतिष्ठान च्या गुरूवर्य अ.वि.बावडेकर विदयालय, बी.एम.गोगटे ज्युनिअर काॅलेजच्या पटांगणावर गुरुवार दि.१६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता भव्य “सकल हिंदू संमेलन” आयोजित करण्यात आले आहे. यावेळी मान्यवर वक्त्यांचे मार्गदर्शन होणार असून संमेलना पूर्वी श्री. माऊली मंदिर येथून पारंपारिक मंगल वेशभूषेत भव्य शोभायात्रा निघणार आहे.

संपूर्ण विश्वामध्ये आपला सनातन हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती सर्वात प्राचीन, अनुकरणीय आणि आदर्श मानली जाते पाचशे वर्षे केलेल्या प्रयत्नांच्या पराकाष्ठे नंतर पुन:निर्माण झालेले राम मंदिर हा याच सनातन हिंदू संस्कृतीचा मानबिंदू आहे.प्रत्येक हिंदूसाठी ही आस्थेची आणि अभिमानाची बाब आहे.आजच्या स्थितीला आपला देश,धर्म,आणि संस्कृती पुढे धर्मातरण, लव्ह जिहाद, गोहत्या अशी अनेक आव्हाने उभी असलेली दिसून येतात अशा परिस्थितीत आपण हिंदू समाज म्हणून आपल्यातील सर्व प्रकारचे मतभेद विसरून एक होणे आवश्यक आहे या सर्व पार्श्र्वभूमीवर हे संमेलन आयोजित केले आहे.

या हिंदू संमेलनात प्रमुख क्वते- श्री. श्रीनिवास दिनकर पेंडसे (व्याख्याते,प्रवचनकार,संगमेश्व), प्रमुख अतिथी – वेदमूर्ती श्री.दत्तात्रेय महादेव मुरवणे गुरुजी (मालवण), प्रमुख अतिथी- श्री हरेकृष्ण भगवान पोळजी महाराज (आसोली) याचा सहभाग असणार आहे. या हिंदू संमेलनानिमित्त याच दिवशी श्री देवी माऊली मंदिर शिरोडा  येथून संमेलन स्थळापर्यत दुपारी ३.३० वाजता पारंपारिक मंगल वेशभूषेत भव्य शोभायात्रा निघणार आहे.

तरी या हिंदू संमेलनात शिरोडा पंचक्रोशीतील सर्व गावातील हिंदू बांधव व भगिनीनी सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून या धर्मकार्यात सहभागी व्हावे अशी विनंती सकल हिंदू संमेलन समिती शिरोडा मंडल कडून करण्यात आली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा