You are currently viewing ओटवणे गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार – विक्रांत सावंत

ओटवणे गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार – विक्रांत सावंत

करमळगाळूवाडीच्या लिंग देवस्थान येथे आयोजित कार्यक्रम उत्साहात संपन्न

 

सावंतवाडी :

ओटवणे गावाला गौरवशाली ऐतिहासिक परंपरा आहे. या गावाशी माझे वडील विकासभाईंसह आजोबा भाईंसाहेब सावंतांपासून जवळचे नाते आहे. त्यामुळे या गावासह करमळगाळूवाडीच्या विकासासाठी जिल्हा परिषद आणि जिल्हा बँकेच्या विविध योजनांच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी दिली.

ओटवणे करमळगाळूवाडीतील लिंग देवस्थान येथे आयोजित कार्यक्रमात विक्रांत सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती अशोक दळवी, पंचायत समिती सदस्या उत्कर्षा गावकर, ओटवणे सरपंच आत्माराम गावकर, उपसरपंच संतोष कासकर, माजी सरपंच रविंद्र म्हापसेकर, गावप्रमुख रविंद्र गावकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष रघुन गावकर, गावठणवाडी मंडळाचे अध्यक्ष उमेश गावकर, माजगाव माजी उपसरपंच संजय कानसे, ग्रामपंचायत सदस्य महेश चव्हाण, प्रशांत बुराण, मनाली गावकर, लावण्या तावडे, कलेश्वर दशावतार मंडळाचे सिद्धेश कलिंगण, पुरोहित विश्वनाथ केळकर, निवृत्त वनपाल गोविंद देवधर, विठ्ठल गावकर, सोसायटी उपाध्यक्ष स्वप्नील उपरकर, निवृत्त शिक्षक मनोहर मयेकर, पोलिस पाटील शेखर गावकर, वायरमन समीर सावंत, दशरथ शृंगार, सुनील मेस्त्री, विश्वनाथ बोर्ये, उमेश म्हापसेकर, शशी गोसावी, संतोष तावडे, नरेंद्र कविटकर, शांतराम शृंगारे, प्रमोद गावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी करमळगाळूवाडीतील अर्जुन तावडे, कांता नाईक, गोरखनाथ भुते, राजन रासम, गजा रासम, विजय तावडे, प्रदीप राणे, लवू तावडे, राजा तावडे, संतोष राऊळ, गिरधर नाईक, सुदेश तावडे, प्रविण म्हापसेकर, अभिजीत तावडे, ऋषी तावडे, नामदेव राऊळ, मंगेश गावकर, सदाशिव गावकर, सखाराम गावकर, शरद नाईक आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन मंडळाचे अश्विनी तावडे यांनी केले, तर आभार अध्यक्ष तावडे यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा