*डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला समाज घडवूया- वैभव नाईक*
*वाडीवरवडे समर्थनगर येथे मा.आ. वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी*
कुडाळ
वाडीवरवडे समर्थनगर येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती आज कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी वैभव नाईक यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नूतन जिल्हापरिषद ,पंचायत समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला.आमदार नसतानाही वैभव नाईक यांनी केलेल्या सहकार्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी मा. आ. वैभव नाईक म्हणाले, जगभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते. वाडीवरवडे गावातील समर्थनगर या छोट्याशा वाडीमार्फत दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती त्याच जोमाने आणि त्याच उत्साहात आपण सर्वजण साजरी करत आहात त्यामुळे बाबासाहेबांचे विचार,त्यांनी केलेला संघर्ष,त्यांचे कार्य पुढील पिढीला समजत आहे. बाबासाहेबांनी अनेक देशांतील घटनांचा अभ्यास करून आपल्या देशाची घटना लिहिली.या घटनेमुळे सर्वसामान्य व्यक्तीला त्यांचे हक्क,अधिकार मिळाले. मात्र काही शक्तींना या घटनेची अडचण ठरत असल्याने मागील लोकसभा निवडणुकीत बाबासाहेबांनी लिहिलेली घटना बदलण्याचे प्रयत्न काही शक्तीकडून केला जात होता. परंतु आपल्या सारख्या देशातील बांधवांनी उठाव करून हा डाव हाणून पडला.आजही घटनेप्रमाणे आपल्याला हक्क,अधिकार मिळत नाही त्यासाठी आपण आवाज उठविला पाहिजे. बाबासाहेबांचे विचार पुसण्याचे काम काही लोक करीत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा बाबासाहेबांचे विचार सर्वांपर्यंत पोहचविण्याची आपली जबाबदारी असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला समाज आपण घडवूया असे आवाहन वैभव नाईक यांनी केले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक,तालुकाप्रमुख कृष्णा धुरी,तालुका संघटक बबन बोभाटे,जि.प.सदस्य रुपेश पावसकर, जि.प.सदस्य गंगाराम सडवेलकर, एस.टी.कामगार सेना जिल्हाप्रमुख अनुप नाईक, शहरप्रमुख संतोष शिरसाट, पंचायत समिती सदस्या ममता राऊळ,तेंडोली सरपंच अनघा तेंडोलकर, वाडीवरवडे सरपंच प्रणिता धुरी, सचिन गावडे,किशोर धुरी,युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, समर्थनगर येथील धर्माजी वरावडेकर,सखाराम वरावडेकर, चंद्रकांत वरावडेकर,रवींद्र वरावडेकर,संतोष वरावडेकर,आदेश वरावडेकर,दिगंबर वरावडेकर,योगेश वरावडेकर,गुंडू वरावडेकर,संदीप वरावडेकर,राजेश वरावडेकर,दीपक नाईक,आकाश नाईक,लवू वरावडेकर,परेश वरावडेकर,गंगाराम वरावडेकर, कृष्णा वरावडेकर,संदेश वरावडेकर,अंकुश धामापूरकर,शुभम वरावडेकर,किशोर नाईक,अर्जुन वरावडेकर आदी उपस्थित होते.
