You are currently viewing सूर सम्राज्ञी..

सूर सम्राज्ञी..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सूर सम्राज्ञी..*

 

आशा आणि आस तू होती सम्राज्ञी तू घरोघरी

तुला ऐकता तुला पाहता तृप्त रसिक तो परोपरी

एक न सोडले क्षेत्र असे तू नाही तुझा ग ठसा जिथे

प्रभात समयी तुला ऐकता आनंदाची लहर उठे..

 

खूप कष्टली खूप तापली निखरून आले सोने तू

गानकलेतील कष्टाळू नि शंभर नंबरी नाणे तू

मधाळ होते गाणे तरीही तलवारीची धार तया

तुझ्या गायना समर्पित ग काशी रामेश्वर गया..

 

शुद्ध होता तुझा स्वर ग सहजी “ पंचम” गाठतसे

अवखळ असो वा लडिवाळ ग गळ्यात तुझिया

सहज बसे

किती गायली “तुला” न त्याला चंद्रसूर्य गे जोवरी

नाट्यपदे ग तुझी झुलवती रंगपटावर नोवरी..

 

बालसुलभ ती किती गायने रूतून बसली हृदयात

नाच रे मोरा नाच रे मोरा नाचणार ना वनात

किती त्या भाषा किती ती गाणी अजरामर तू

राहशील

पिढ्या ही पुढच्या तुला ऐकतील अचंबित त्या

होतील..

 

प्रसन्नवदना सदा राहिली दु:ख कुपीतच ठेवून

प्रवाद पचवून उभी राहिली सारे पचविले गाऊन

कसे जगावे आनंदाने जीवन गाणे बनवावे

आदर्शच तू तसे पाहता ध्यानी सदा हो ठेवावे…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा