मिशन आयएएसचे काम हे अभूतपूर्व आहे. फक्त एक रुपयामध्ये स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देणारी ही संस्था महाराष्ट्रातील अनेक युवकांना घडवित आहे. मिशनचे संचालक प्रा.डा. नरेशचंद्र काठोळे हे याही वयामध्ये या मिशनसाठी अहोरात्र काम करीत आहेत हे खरोखरच माझ्यासाठी अभिमानाची व गौरवाची गोष्ट आहे म्हणून मी आपल्या सर्वांच्या साक्षीने त्यांना वंदन करते हे उद्गार आहेत मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री व माहेरची साडी या चित्रपटांमुळे महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचलेल्या श्रीमती अलका कुबल यांचे. जीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. त्या नुसतं बोलल्यास नाही तर खचाखच भरलेल्या सभागृहामध्ये त्यांनी वाकून मिशन आय ए एसचे संचालक प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे यांना यांना वाकून नमस्कार केला.
नवी मुंबई येथील नेरूळ भागात कार्यरत असणाऱ्या श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्टच्या माई बाळ साधन च्या वार्षिक कार्यक्रमात श्रीमती अलका कुबल यांना बोलाविण्यात आले होते. जीवन गौरव पुरस्कार वितरित करण्याअगोदर मिशन आयएएसचे संचालक प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे यांचा थोडक्यात जीवनपट स्क्रीनवर दाखविण्यात आला. त्या पाहून श्रीमती अलका कुबल ह्या इतक्या भारावल्या की त्यांनी मागचा पुढचा विचार न करता सरळ वाकून काठोळे सरांना नमस्कार केला.
नवी मुंबईतील आगरी कोळी भवन नागरिकांनी खच्च भरले होते. एवढी मोठे अभिनेत्री एका व्यक्तीच्या पाया पडते ही खरोखरच फार मोठी गोष्ट होती. पण अलका कुबल यांनी वाकून आपली विनयशीलता दाखवून दिली आहे.
नवी मुंबई मधील आगरी कोळी सभागृहात संपन्न झालेल्या या 28 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध उद्योजक दीपक तायडे प्रवीण वाकडे संदेश असरेकर दीपक कापसे उपायुक्त मेहबूब कासार दीपक वाळके यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.
माई बाल सदन ही गेल्या 28 वर्षांपासून कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान न घेता आणि मुला-मुलींचे संगोपन शिक्षण हे लोक वर्गणीतून करते .आज संस्थेचे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या पदावर संपूर्ण भारतामध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या वार्षिक कार्यक्रमात हा जीवन गौरव पुरस्कार वितरण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
श्रीमती अलका कुबल यांनी मिशन आय ए एस.च्या कार्याची दखल घेऊन मी अमरावतीला आली तर तुमच्या घरी जरूर येईल असे आश्वासन देखील प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांना दिले. मिशन आयएएसच्या रौप्य महोत्सवामध्ये श्रीमती अलका कुबल यांना निमंत्रित करण्यात आले असून त्यांनी ते निमंत्रण स्वीकारले आहे.
याप्रसंगी प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी माई बाल संगोपनच्या अनाथ व गरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे विनामूल्य प्रशिक्षण देण्याचा संकल्प जाहीर केला. याप्रसंगी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता संस्थेचे अध्यक्ष श्री बाळासाहेब देशमुख यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. जीवन गौरव पुरस्काराचे वितरण झाल्यानंतर संस्थेतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. या पूर्ण कार्यक्रमाला रसिकांची भरगच्च उपस्थिती होती
