You are currently viewing जिल्हावासीयांच्या मदतीसाठी  राणे कुटुंबीय सर्वप्रथम…

जिल्हावासीयांच्या मदतीसाठी  राणे कुटुंबीय सर्वप्रथम…

आम. नितेश राणें कडून १५ लाख ​७७ हजार चा निधी दिल्याची माहिती, माहितीच्या अधिकारात समोर

कणकवली : ​
विरोधी पक्षाचे आमदार असून देखील सिंधुदुर्ग जिल्हावासियांच्या मदतीसाठी आमदार नितेश राणे धावल्याचे दिसून आले आहे. कोरोना काळात जिल्हा रुग्णालयाला दिलेल्या आमदार निधीमध्ये नितेश राणे यांनी जिल्ह्यातील जनतेला चांगले उपचार मिळावेत व दर्जेदार साधन सामुग्री उपलब्ध व्हावी म्हणून ​१५ लाख ​७७ हजार चा निधी दिल्याची माहिती माहितीच्या अधिकारात समोर आली आहे. मालवण पंचायत समिती चे सभापती अजिंक्य पाताडे यांनी माहितीच्या अधिकारात घेतलेल्या माहितीतून ही बाब उघड झाली आहे. त्यामुळे आमदार नितेश राणेंनीच कोव्हीड काळात जिल्हा रुग्णालयाला सत्ताधारी खासदार, आमदारांपेक्षा अधिकचा निधी देत जिल्हावासीयांना साठी पुन्हा एकदा राणे सर्वप्रथम असल्याचे दाखवून दिले आहे. सत्ताधारी आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर यांच्याकडून ​० निधी उपलब्ध असल्याची बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या फक्त पोकळ बाता असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे सत्ताधारी असलेले खासदार विनायक राऊत यांनी जिल्ह्यासाठी अवघे तीन लाख रुपये दिले आहेत. पी पी ई किट, मास्क, सॅनिटायजर, ग्लोव्हज, रॅपिंग बॅग्ज, रुग्णाचे जेवण आदी खर्च आमदार नितेश राणे यांनी दिलेल्या व अन्य हेडमधील निधीतून करण्यात आला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा वासियांचे तारणहार म्हणून पुन्हा एकदा राणे कुटुंबीयच पुढे असल्याचे दिसून आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − 1 =