You are currently viewing जरी पुसल्या लाटांनी

जरी पुसल्या लाटांनी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*जरी पुसल्या लाटांनी*

 

पुसल्या लाटांनी

जरी किना-याच्या रेषा

मनी जिगीविषा

जागी तीच….!!

 

खळखळ येते

लाट ती मोडाया

कष्ट जाती वाया

उगाचच…!!

 

सोडू नये तरी

प्रयत्नांना कोणी

आनंदाच्या गोणी

भराव्यात…!!

 

किती येती विघ्न

काम अवघड

करावे सुघड

हातोहाती…!!

 

लाटांनी पुसता

मिटतात खुणा

नवी लिहू पुन्हा

यशोगाथा….!!

 

मुळी नाही कधी

मागे सरायचे

पाय रोवायचे

शक्तीनेच…!!

 

प्राक्तनाची लाट

आयुष्य मिटते

भविष्य लिहिते

पुन्हा नवे….!!

 

अरुणा दुद्दलवार✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा