अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राज्यातील मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी व्याज परतावा योजना
सिंधुदुर्गनगरी
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राज्यातील मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी व्याज परतावा योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाचा व्यापक वापर, पारदर्शकता आणि नागरीकाभिमुख सेवा यावर भर देत महामंडळाने लाभार्थ्यांसाठी अनेक सोयीस्कर आणि नाविन्यपूर्ण सुविधा उपलब्ध करून दिले असल्याचे माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक स्नेहल पुजारे व गोविंद परब यांनी दिली आहे .
महामंडळामार्फत आजपर्यंत सुमारे रु.१,६७० कोटींहून अधिक आर्थिक सहाय्य व्याज परतावा स्वरूपात वितरित करण्यात आले असून, राज्यातील १ लाख ७० हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. महामंडळाची योजनांची कार्यवाही सुरु झाल्यापासून वर्षनिहाय फलनिष्पत्ती खालीलप्रमाणे आहे.
| आर्थिक वर्ष | पात्रता प्रमाणपत्र (LOI) संख्या | मंजूर लाभार्थ्यांची संख्या | व्याज परतावा रक्कम (रु. कोटीमध्ये) |
| FY2017-18 | 649 | 28 | 0 |
| FY2018-19 | 10,925 | 3,367 | 2.60 |
| FY2019-20 | 19,625 | 11,896 | 28.53 |
| FY2020-21 | 14,696 | 8,325 | 63.55 |
| FY2021-22 | 16,791 | 16,482 | 118.29 |
| FY2022-23 | 18,672 | 15,895 | 178.81 |
| FY2023-24 | 37,557 | 24,491 | 301.02 |
| FY2024-25 | 35,601 | 46,792 | 388.88 |
| FY2025-26 | 38,843 | 49,992 | 588.69 |
| Total | 1,93,359 | 1,77,268 | 1670.37 |
लाभार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे योजनाविषयी अचूक, जलद आणि विश्वासार्ह माहिती मिळवणे ही काळाची गरज बनली होती. याच पार्श्वभूमीवर महामंडळाने Smart Bot आणि WhatsApp सेवा सुरू करून एक मोठा डिजिटल टप्पा गाठला आहे.
Smart Bot: लाभार्थी व संभाव्य लाभार्थी यांच्या प्रश्नांना तात्काळ उत्तर : लाभार्थ्यांना अनेकदा योजनांची माहिती, पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया किंवा व्यवसाय निवड यासंबंधी विविध प्रश्न निर्माण होतात. पूर्वी या माहितीसाठी कार्यालयीन भेटी, एजंट किंवा दीर्घ प्रतिक्षा यांचा सामना करावा लागत होता. हीच अडचण दूर करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित (ChatGPT) Smart Bot सुरू करण्यात आला आहे. हा Smart Bot महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असून, 24×7 कार्यरत आहे. कोणत्याही वेळी लाभार्थी आपला प्रश्न टाईप करून त्वरित उत्तर मिळू शकतात. Smart Bot द्वारे योजनांची सविस्तर माहिती, अर्ज करण्याची पद्धत व आवश्यक कागदपत्राची माहिती व्यवसाय निवडीसाठी मार्गदर्शन, अपेक्षित प्रकल्प खर्च व आर्थिक नियोजन ,अर्जाच्या स्थितीबाबत प्राथमिक मार्गदर्शन व इतर सुविधा उपलब्ध होत आहेत.आत्तापर्यंत 15500 पेक्षा अधिक लाभार्थ्यांनी या Smart Bot चा लाभ घेतला आहे .सदरचा Smart Bot महामंडळाच्या अधिकृत वेट प्रणालीवर उजव्या बाजूला Icon स्वरूपात दर्शविला आहे .त्यावर क्लिक केल्यास आपण विचारलेल्या प्रश्नांनुसार आवश्यक सर्व माहिती उपलब्ध होते.
WhatsApp सेवा – माहिती आता थेट तुमच्या मोबाईलवर– आजच्या डिजिटल युगात WhatsApp हे सर्वाधिक वापरले जाणारे माध्यम आहे. याचाच विचार करून महामंडळाने WhatsApp सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे लाभार्थ्यांना त्यांच्या अर्जासंबंधित सर्व महत्त्वाची माहिती थेट मोबाईलवर मिळत आहे. WhatsApp सेवेद्वारे LOI (Letter of Intent) संबंधित अपडेट्स, Claim सादर केल्याची प्रक्रिया स्थिती, Sanction (मंजुरी) बाबत माहिती, व्याज परतावा जमा झाल्याची सूचना व इतर माहिती Templete द्वारेउपलब्ध करून देण्यात येत आहे.
महामंडळाचा अधिकृत WhatsApp क्रं. ८९७६८५५९२१ असून लाभार्थ्यांच्या WhatsApp क्रमांकावर आलेल्या Message ला 24 तासाच्या आत रिप्लाय करावा. जेणेकरुन या WhatsApp द्वारे लाभार्थ्यांना त्यांच्या प्रकरणाची सद्यस्तिथी वेळोवेळी अवगत होईल व लाभार्थ्यांना कोणत्याही माहिती साठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज लागणार नाही.
महामंडळामार्फत WhatsApp Channel सुरु करण्यात आले असून, त्याद्वारे महामंडळामार्फत सुरु करण्यात आलेले उपक्रम, नवीन परिपत्रके, शासन निर्णय व इतर महत्त्वाच्या बाबींची माहिती लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यात येत आहे. महामंडळाच्या अधिकृत WhatsApp चॅनेलला Subscribe करा. सदरच्या WhatsApp Channel ची लिंक महामंडळाच्या वेबपोर्टलवर उपलब्ध असून, ही लिंक https://whatsapp.com/channel/0029VbBvVEo0VyclgdFnSu2H
महामंडळाच्या कार्याचा वाढता व्याप आणि भविष्यातील गरजा लक्षात घेता, बहुउद्देशीय मुख्यालय उभारण्याच्या दृष्ट्टीने पनवेल ,नवी मुंबई येथे सिडकोची सुमारे 1.5 एकर जागा महामंडळाला मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णयाप्रमाणे रु. 1 रु. प्रती चौ.मी. दराने मंजूर करण्यात आली आहे. या संदर्भातील अधिकृत Allotment Letter महामंडळास प्राप्त झाले असून, सद्यस्थितीत जागा हस्तांतरणाची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. प्रस्तावित जागेवर अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी बहुउद्देशीय इमारत उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या इमारतीमध्ये प्रशासकीय कार्यालय, लाभार्थी सहाय्यता केंद्र, प्रशिक्षण व कौशल्य विकासासाठी स्वतंत्र विभाग, निवासी प्रशिक्षण केंद्,संशोधन सुविधा, डिजिटल सेवा केंद्र तसेच परिषद व मार्गदर्शन कक्ष उभारले जाणार आहेत.यामुळे महामंडळाचे कामकाज अधिक कार्यक्षम गतिमान व सुलभ होण्यास मदत होईल.
