महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र उद्योगनगच्या वतीने सामाजिक समता सप्ताह कार्यक्रममाचे आयोजन .
चिंचवड
दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम चिंचवड येथील उद्योगनगर येथे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गुणवंत कामगार अण्णा जोगदंड तर वक्ते प्राध्यापक केरनाथ ढवळे होते यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला .प्रमुख पाहुणे व वक्ते यांच्या शुभहस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे वक्ते प्राध्यापक केरनाथ ढवळे यांनी संविधान जागर – मूलभूत हक्क व मूलभूत कर्तव्य या विषयावर व्याख्यान दिले ते म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पहिले कायदामंत्री होते समाजसुधारक, शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी संविधान हे दोन वर्ष अकरा महीने 17 दिवसात पूर्ण केले आणि 32 डिग्री आणि सात पीएचडी असलेले बाबासाहेब यांच्या संविधानाचे पारायण झाले पाहिजे असे मत व्यक्त केले.
प्रमुख पाहुणेआण्णा जोगदंड म्हणाले की जगातील 154 देशांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे, कायदा करणारे पेक्षा कायदा राबवणारे श्रेष्ठ असतात असे डॉ बाबासाहेब आंबेडकरनेहमी सांगत असे आणि वाचाल तर वाचाल असे त्यांचे वाक्य असायचे, अन्यायाविरुद्ध ते पेटून उठत असत, संसदेने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयात रद्द करू शकते अशी त्यांनी संविधानामध्ये तरतूद केल्याचे जोगदंड यांनी सांगितले, आणि कायदा करणाऱ्या पेक्षा कायदा राबवणारे श्रेष्ठ असतात असे नेहमीच ते म्हणत असे.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनांची माहिती केंद्र संचालक प्रदीप बोरसे यांनी उपस्थितांना त्यांना दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत, व सूत्रसंचालन प्रदीप बोरसे यांनी केले तर आभार अश्विनीताई दहीतुले यांनी मानले, गुणवंत कामगार राम शिंदे यांनी कामगार मंडळाच्या विविध योजनांची सर्व कामगारांनी माहिती घेऊन फायदा घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अण्णा जोगदंड वक्ते केदारनाथ ढवळे, तसेच रयत शिक्षण संस्थेचे सुदाम शिंदे ,गुणवंत कामगार संगीताताई जोगदंड, दत्तात्रय अवसरकर,शिवराज शिंदे, सूर्यकांत बरसावडे साखरचंद महाराज लोखंडे, पांडुरंग सुतार, हेमंत पवार, राजेश गाढवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
