You are currently viewing खिडकीत तू दिसता

खिडकीत तू दिसता

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. कविता किरण वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*खिडकीत तू दिसता*

 

खिडकीत तू दिसता

सुरांचा दरवळ दाटला

तुझ्या एका स्वराने

श्रावण मनी ओथंबला

 

स्वरांच्या खिडकीतून

तू जगाला न्याहाळले

आणि तुझ्या गाण्याने

प्रत्येक हृदय शहारले

 

कधी विरहाची सावली

तर कधी ओढ प्रेमाची

आवाजाचा प्रत्येक शब्द

साद जणू आनंदाची

 

खिडकीच्या पाठीमागे

एक अथांग स्वरसागर

जिथे विरून जातात दु:ख

आणि उरतो फक्त आदर

 

तू दिसता त्या खिडकीत

काळही क्षणभर थांबला

तुझ्या स्वरांच्या जादूने

अवघा आसमंत न्हाहला

 

खिडकीतल्या प्रकाशाने

संगीताचे अंगण उजळले

आणि तुझ्या अष्टपैलू सुरांनी

आमचे सारे आयुष्य सजले

 

सौ कविता किरण वालावलकर

दावणगिरी, कर्नाटक

प्रतिक्रिया व्यक्त करा