You are currently viewing वालावल बंगेवाडी मध्ये दरड कोसळून घराला तडे

वालावल बंगेवाडी मध्ये दरड कोसळून घराला तडे

 

ओबीसी जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर यांनी केली पाहणी

कुडाळ :

कुडाळ तालुक्यातील वालावल बंगेवाडी मध्ये दरड कोसळून बाबू उर्फ केशव बंगे यांच्या घराला तडे गेले. लागलीच बंगे कुटुंबीयांनी ६ घरे खाली केली.या ठिकाणी भविष्यात माळीन सारखी दुर्घटना उद्भवण्याची भीती आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ या प्रकाराची दखल घ्यावी. केशव बंगे यांच्या घराची ओबीसी जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, प्रसाद प्रभू, सुनील करवडकर, नेरूर ग्रामपंचायत सदस्य संतोष कुडाळकर, गोविंद पेडणेकर यांनी पाहणी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा