*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शाश्वत सत्यता*
〰️〰️〰️〰️〰️
जाहलो मी सर्वांती मोकळा रिकामा
आता हरविण्यासारखे उरलेच नाही
जपले तुला सर्वस्व तू म्हणुनी अंतरी
अन्यत्र हा आत्मा कुठेच रमला नाही
हा प्राण अविरत तुझ्यातची गुंतलेला
अंतरातील ज्योत तुझी विझली नाही
श्वासात या , तुझेच कैवल्याचे चांदणे
तुझ्या कृपेचे निर्झर कधी आटले नाही
तूची कृपाळू , कृपावंत एक मुक्तिदाता
यावीण शाश्वत दृष्टांत कोणताच नाही
तुझ्या स्मृतीत जगणे हिच तृप्ती आगळी
तुझ्या चरणी कुठलाच रे दूजाभाव नाही
तूच निष्पापी चित्रगुप्त तराजू तोलणारा
तुझ्याठाई दुष्कर्मास कधीच क्षमा नाही
भावभक्तिचा तू अथांग पावन महासागर
तहान तुझ्या अमृताची कधी संपत नाही
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*©️वि.ग.सातपुते (भावकवी)*
