You are currently viewing ना. नितीन गडकरींनी कोकण वासियांची माफी मागण्यापेक्षा कोकण वासियांना टोलमाफी द्यावी- वैभव नाईक

ना. नितीन गडकरींनी कोकण वासियांची माफी मागण्यापेक्षा कोकण वासियांना टोलमाफी द्यावी- वैभव नाईक

*ना. नितीन गडकरींनी कोकण वासियांची माफी मागण्यापेक्षा कोकण वासियांना टोलमाफी द्यावी- वैभव नाईक*

मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरु झाल्यापासून आज जवळपास १४ वर्षानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हा महामार्ग मे २०२६ पर्यंत पूर्ण होईल असे आश्वासन काल दिले आहे. मात्र हा महामार्ग रखडण्यास नितीन गडकरीच कारणीभूत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा सोडला तर रत्नागिरी, रायगड मध्ये महामार्गाचे काम करणारे ठेकेदार कामे अर्धवट टाकून निघून गेले तरी त्यांना पाठीशी घालण्याचे काम नितीन गडकरी यांनी केले. महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत काल नितीन गडकरी यांनी जनतेची माफी मागितली परंतु, ही माफी केवळ टोल वसुली करण्यासाठी मागितली आहे का? मुंबई गोवा महामार्ग अर्धवट स्थितीत ठेवल्याने महामार्गावर झालेल्या अपघातात हजारो कोकणवासियांचे प्राण गेले त्यांच्या कुटूंबियांना सरकार आर्थिक मदत करणार का? १४ वर्षे हा महामार्ग अपूर्णावस्थेत ठेवल्याबद्दल नितीन गडकरी यांनी कोकण वासीयांची माफी मागण्यापेक्षा कोकण वासियांना मुंबई गोवा महामार्गावर टोलमाफी द्यावी असे कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक म्हणाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा