You are currently viewing फोंडाघाटमध्ये नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचा जल्लोषात शुभारंभ

फोंडाघाटमध्ये नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचा जल्लोषात शुभारंभ

फोंडाघाटमध्ये नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचा जल्लोषात शुभारंभ

लाडू वाटप, अभिषेक, स्पर्धा व समाजोपयोगी उपक्रमांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

फोंडाघाट

खासदार नारायणराव तथा दादा राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षाची सुरुवात फोंडाघाटमध्ये भाजपा स्थानिक नेतृत्व, कार्यकर्ते आणि दादा प्रेमी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत जल्लोषात करण्यात आली. कार्यकर्त्यांच्या मनात आदर, सन्मान आणि उमेदीची भावना जागवणारे नेतृत्व म्हणून दादा राणे यांच्याविषयी विशेष भावना व्यक्त करण्यात आल्या.
सकाळी दहा वाजता एस.टी. स्टँड परिसरात फटाक्यांच्या आतषबाजीत “दादा राणे आगे बढो” अशा बुलंद घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी प्रवासी व कर्मचाऱ्यांना लाडू वाटप करण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांनी दादांना उदंड आयुष्य आणि निरामय आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या.
यापूर्वी लोरे नं. १ येथील ग्रामदैवत गांगो चाळा तसेच घोणसरी येथील श्री विघ्नविनाशक मंगलमूर्ती ग्रामदेवतेच्या मंदिरात अभिषेक करून दादांच्या उत्तम आरोग्यासाठी साकडे घालण्यात आले. वाघेरी येथे त्यांच्या जीवनपटावर आधारित वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
तसेच फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी अॅडजस्टेबल बेड तसेच जीवन आनंद संस्था फोंडाघाट यांना वॉटर प्युरिफायर देण्यात आला. या वेळी डॉ. गणेश यादव, दिलीप ईश्वलकर, महादेव कोकरे, आरोग्यसेविका स्टाफ तसेच जीवन आनंद संस्थेचे आशिष कांबळी, अनुराधा साटम, अनुजा सावंत आणि दिव्यांग बंधू-भगिनी उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमात पंचायत समिती सदस्य पवन भालेकर, लोरे सरपंच अजय रावराणे, तन्वी मोदी, विश्वनाथ जाधव, अलंकार रावराणे, दर्शना पेडणेकर, चंदू गुरव, प्रकाश वाघेरकर, मंगेश नेवगे, अजय चिक्के, मिलिंद लाड, मिहीर मराठे, नरेश गुरव, दामोदर नारकर, विलास मराठे, सुरेश एकावडे, निलेश लाड, भाई तेली, संतोष पारकर, रुपेन चव्हाण, मंदार मराठे यांच्यासह बहुसंख्य भाजपा कार्यकर्ते आणि दादा प्रेमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा