You are currently viewing कणकवली पंचायत समिती उपसभापती​ ​पदी प्रकाश पारकर यांची बिनविरोध निवड

कणकवली पंचायत समिती उपसभापती​ ​पदी प्रकाश पारकर यांची बिनविरोध निवड

कणकवली
कणकवली पंचायत समिती उपसभापती पदासाठी सुप्रसिद्ध भजनी बुवा प्रकाश पारकर यांची बिनविरोध निवड झाली. पारकर यांच्या रूपाने कासार्डे पंचायत समिती गणाला पहिल्यांदाच प्रतिनिधित्व मिळाले आहे. यावेळी ढोल ताशांच्या गजराने पंचायत समितीचा परिसर दुमदुमून गेला.
कणकवली पंचायत समितीच्या उपसभापती पदाचा दिव्या पेडणेकर यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्या जागी आता कासार्डे पंचायत समिती गणाचे सदस्य जिल्ह्यातील नामवंत भजनीबुवा प्रकाश पारकर यांची भाजपा पक्षाने निवड केली आहे.
भाजपा नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे यांच्याकडून नाव निश्चित झाल्यानंतर दुपारी प्रकाश पारकर यांनी उपसभापती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला. एकमेव अर्ज असल्याने ही निवड बिनविरोध होणार हे निश्चित होते. या निवडी प्रसंगी तहसीलदार आर जे पवार, सभापती मनोज रावराणे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, पूजा पारकर, मुलगा सौरभ पारकर, प्रथमेश पारकर, माजी उपसभापती दिव्या पेडणेकर, जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई,  तालुका अध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, गणेश तांबे, दिलीप तळेकर, स्मिता माडलीकर, सुचिता दळवी, महेश लाड, सोनू सावंत, बबलू सावंत, राजू हिर्लेकर, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, पी डी पालकर, प स कर्मचारी, तन्वी सरवनकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा