कोलझरच्या सुपुत्र दिवाकर देसाई यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या CEO पदी नियुक्ती
दोडामार्ग
कोलझर गावचे सुपुत्र श्री. दिवाकर शिवराम देसाई यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
यावेळी परमे ग्रुप सोसायटीचे व्हाइस चेअरमन मा. श्री. रामदास राजाराम मेस्त्री हे उपस्थित राहून त्यांनी श्री. देसाई यांचे अभिनंदन करत पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. देसाई यांच्या नियुक्तीमुळे कोलझर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या कार्यकाळात बँकेची प्रगती अधिक वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
