You are currently viewing सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात नव्या लिफ्टचे लोकार्पण
Oplus_16908288

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात नव्या लिफ्टचे लोकार्पण

माजी मंत्री आमदार दीपक (भाई) केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन; नगराध्यक्ष युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती

सावंतवाडी :

सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या नव्या इमारतीत बसविण्यात आलेल्या नव्या लिफ्टचे लोकार्पण माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला सावंतवाडीच्या नगराध्यक्ष युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले उपस्थित होत्या.

या नव्या सुविधेमुळे रुग्ण तसेच वृद्ध नागरिकांना मोठा फायदा होणार असून रुग्णालयातील सेवा अधिक सुलभ होणार आहे. लिफ्टच्या माध्यमातून रुग्णांची हालचाल सुलभ होऊन उपचार प्रक्रियेला गती मिळणार आहे.

या प्रसंगी नगराध्यक्ष युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य देव्या सूर्याजी, नगरसेविका निलम नाईक, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर एवाळे, गौरी गोसावी, प्राची राणे, सुप्रिया नाईक, अमृता मुंगी, हेमांगी रणदिवे, रश्मी नाईक, दीक्षा चव्हाण, मानसी बागेवाडी, प्राजक्ता रेडकर, निलम पडवळ, प्रशांत सातार्डेकर, अनघा चव्हाण आदींसह रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा