You are currently viewing करूळ घाटात भीषण अपघात

करूळ घाटात भीषण अपघात

करूळ घाटात भीषण अपघात; सिमेंटचा ट्रक ५०० फूट दरीत कोसळला, बाप-लेकांचा जागीच मृत्यू

सह्याद्री जीव रक्षक टीम व पोलिसांचे अथक प्रयत्न; कठीण परिस्थितीत मृतदेह बाहेर काढण्यात यश

वैभववाडी

वैभववाडी तालुक्यातील करूळ घाटात आज एक भीषण अपघात घडला. सिमेंटने भरलेला ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने थेट सुमारे ५०० फूट खोल दरीत कोसळला. या दुर्घटनेत विजापूर येथील बाप आणि मुलाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. करूळ येथील सह्याद्री जीव रक्षक टीमच्या मदतीने तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. दरी अतिशय खोल आणि धोकादायक असल्याने बचावकार्य करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, टीमच्या अथक प्रयत्नांनंतर दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
या वेळी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्यासह पोलीस कर्मचारी, तसेच सह्याद्री जीव रक्षक टीमचे अध्यक्ष हेमंत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठी मेहनत घेतली. याशिवाय स्थानिक ग्रामस्थ आणि भैरीभवानी संस्थेचे गिरीधर रावराणे यांनीही बचावकार्याला मोलाचे सहकार्य केले.
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, मृतांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा