सिंधुदुर्गनगरी
कणकवली तालुक्यातील 2 ठिकाणी कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. सदर कंटेन्मेंट झोन पुढील प्रमाणे आहेत. मौजे कणकवली शहर येथील तेलीआळी येथील घर क्र. 2/248 व घर क्र. 2/177 व परिसर येथे दिनांक 8 मार्च 2021 रोजी रात्री 12 वाजे पर्यंत कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये जाहीर करण्यात आलेल्या दिनांकापर्यंत सर्व अस्थपना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच नागरिकांच्या येण्या-जाण्यास व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. सदर आदेश अत्यावश्यक सेवा जसे सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था इ. वितरीत करणारे, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या वाहनांना लागू असणार नाहीत. या आदेशाचा भंग केल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 व 58, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 71,139 आणि भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल असे आदेश कणकवलीच्या प्रांताधिकारी यांनी दिले आहेत.