You are currently viewing न्हावेली-पार्सेकरवाडीत २८ मार्चला भव्य जिल्हास्तरीय भजन स्पर्धा; आठ नामवंत मंडळांचा सहभाग

न्हावेली-पार्सेकरवाडीत २८ मार्चला भव्य जिल्हास्तरीय भजन स्पर्धा; आठ नामवंत मंडळांचा सहभाग

न्हावेली-पार्सेकरवाडीत २८ मार्चला भव्य जिल्हास्तरीय भजन स्पर्धा; आठ नामवंत मंडळांचा सहभाग

कै. बुवा भूषण पार्सेकर स्मृतीप्रित्यर्थ आयोजन; आकर्षक बक्षिसांसह वैयक्तिक गुणांनाही गौरव

सावंतवाडी

न्हावेली-पार्सेकरवाडी येथील स्वरभूषण मित्रमंडळातर्फे कै. बुवा भूषण उदय पार्सेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ २८ मार्च रोजी भव्य जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजता या स्पर्धेला प्रारंभ होणार असून जिल्ह्यातील आठ नामवंत भजन मंडळे आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत.
स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार सायंकाळी ६ वाजता कारिवडे येथील श्री देव कालिका प्रासादिक भजन मंडळ (बुवा सुदिप गावडे) भजनाने सुरुवात करतील. सायंकाळी ७ वाजता सातुळीचे श्री देवी सातेरी प्रासादिक भजन मंडळ (बुवा अमित परब), रात्री ८ वाजता मळगावचे श्री देव समाधी पुरुष प्रासादिक भजन मंडळ (बुवा गौरांग राऊळ) आणि रात्री ९ वाजता वेंगुर्ला-सुरंगपाणी येथील चिंतामणी प्रासादिक भजन मंडळ (बुवा अनिकेत भगत) आपली कला सादर करतील.
यानंतर रात्री १० वाजता माणगावचे नवतरुण युवक भजन मंडळ (बुवा ओंकार कुंभार), ११ वाजता मातोंडचे श्री देव इसोटी प्रासादिक भजन मंडळ (बुवा सचिन सावंत), मध्यरात्री १२ वाजता पिंगुळीचे श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ (बुवा प्रसाद आमडोसकर) आणि रात्री १ वाजता वेंगुर्ला-अणसूर येथील सद्गुरु प्रासादिक भजन मंडळ (बुवा हर्षल मेस्त्री) सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ११,१११ रुपये, द्वितीय ७,७७७ रुपये आणि तृतीय ५,५५५ रुपये रोख व चषक असे आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच उत्कृष्ट गायक, पखवाज, हार्मोनियम, झांज, कोरस आणि तबला वादक अशा सहा वैयक्तिक गटांमध्ये प्रत्येकी १,००१ रुपये, प्रमाणपत्र व चषक देऊन कलाकारांचा गौरव करण्यात येणार आहे.
भजन संस्कृतीचा वारसा जतन करण्याच्या उद्देशाने आयोजित या स्वरमहोत्सवाचा लाभ सर्व भजनप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन स्वरभूषण मित्रमंडळ, न्हावेली यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा