You are currently viewing मांगवली रस्त्याला मांगवली येथे अरूणा नदी ब्रीजला पडलेले भगदाडाला तत्काळ कॉन्क्रीटीकरण करून मिळणे बाबत…..

मांगवली रस्त्याला मांगवली येथे अरूणा नदी ब्रीजला पडलेले भगदाडाला तत्काळ कॉन्क्रीटीकरण करून मिळणे बाबत…..

वैभववाडी तालुका काँग्रेस तर्फे गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर

वैभववाडी

मांगवली रस्त्याला मांगवली येथे अरूणा नदी ब्रीजला पडलेले भगदाडाला तत्काळ कॉन्क्रीटीकरण करून मिळणे संदर्भात वैभववाडी तालुका काँग्रेस तर्फे तसेच वैभववाडी ग्रामस्थ यांनी वैभववाडी बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री सुतार यांना लेखी निवेदन सादर केले आहे. या रस्त्याचा विषय गावकरी व शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचा असून रोज ४० विद्यार्थी, तसेच गावकरी या रस्त्याने नियमीत प्रवास करीत असतात. माँदे, आखवणे, भोम, मांगवली, वेंगसर या भागातील लोक, शालेय विद्यार्थी या रस्त्याने / मार्गाने प्रवास करीत असतात.
अभियंता श्री सुतार यांनी हा विषय गांभिर्याने घेतलेला नाही. त्यामुळे त्याचा परिणाम आता दिसून येत आहे त्याठिकाणी मोठे भगदाड पडले असल्याने रस्ता वहातुकीस बंद झाला आहे. एसटी महामंडळ यांनी देखीला आपली वहातुक या रस्त्याने भगदाड पडल्याने व प्रवाशांच्या सुरक्षेस्तव एसटी फेरी होणार नाही असे सांगितलेले आहे. तरी या सर्वाला आपले बांधकाम विभाग सर्वस्वी जबाबदार आहे व शाळेच्या विद्याथ्यांच्या शालेय नुकसानीला, गावक-यांच्या प्रवासाला देखील आपल्या पंचायत समितीचा बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार जबाबदार आहे.
त्याच पध्दतीने मांगवली फाटा ते शिवरी फाटा या रस्त्याला देखील मोठेच्या मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यावरून दुचाकी, तिन चाकी, चारचाकी वाहाणे कशी चालवावीत हा प्रश्न आहे. तरी ते खड्डे त्वरीत भरून मिळावेत अशा आशयाचे निवेदन वैभववाडी तालुका काँग्रेस तर्फे तालुकाध्यक्ष दादामीया पाटणकर, उपाध्यक्ष वसंत नाटेकर, जिल्हा सचिव मीनाताई बोडके यांच्या उपस्थितीत वैभववाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा