पुण्यातील ‘फ्लाईंग बर्ड स्कूल’चे संस्थापक जयंत परांजपे यांच्याकडून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला ५० हजारांची मदत
रुग्णवाहिकेसाठी निधी; सेवाभावी कार्याची घेतली दखल
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’च्या निस्वार्थी सेवाभावी कार्याची दखल घेत पुण्यातील ‘फ्लाईंग बर्ड स्कूल’चे संस्थापक जयंत परांजपे आणि सुजाता परांजपे यांनी ५० हजार रुपयांची देणगी सुपूर्त केली आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष संजय पेडणेकर यांच्याकडे ही मदत सुपूर्त करण्यात आली असून, या निधीचा विनियोग रुग्णवाहिकेसाठी केला जाणार आहे.
यावेळी बोलताना जयंत परांजपे म्हणाले की, आम्ही पुण्यात राहत असलो तरी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्य जवळून पाहिले आहे, जे खरोखरच कौतुकास्पद आहे. निराधार लोकांना आधार देणे, अपघातग्रस्तांना तातडीने मदत करणे आणि रुग्णांना २४ तास सेवा देण्याचे काम ही संस्था चोखपणे बजावत आहे. याच कार्याला हातभार लावण्यासाठी ही मदत देण्यात आली आहे.
आज केवळ सिंधुदुर्गच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात या संस्थेच्या कामाची दखल घेतली जात आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते, बँका, पतसंस्था आणि नागरिक या संस्थेच्या पाठीशी उभे राहत आहेत.
या मदतीबद्दल प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे, संजय पेडणेकर, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम आणि रवी जाधव यांनी परांजपे दाम्पत्याचे आभार मानले आहेत.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग
(अॅम्बुलन्स व्हॅनसाठी देणगी नोंद)
दिनांक : 25/03/2026 रोजी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या अॅम्बुलन्स व्हॅन उपक्रमासाठी एकूण ₹50,000/- (अक्षरी पन्नास हजार रुपये फक्त) रक्कम बँक खात्यामार्फत जमा करण्यात आली आहे.
ही देणगी खालील दात्यांकडून प्राप्त झाली आहे :
श्री. जयंत सुधा जयराम परांजपे
आणि
सौ. सुजाता जयंत परांजपे
संस्थापक – फ्लाईंग बर्ड स्कूल, पुणे
सदर देणगी पुढील व्यक्तींच्या स्मरणार्थ अर्पण करण्यात आली आहे :
कै. तात्या (जयराम केशव परांजपे), तळवणे – ₹11,000/-
कै. सौ. सुधा जयराम परांजपे, तळवणे – ₹11,000/-
कै. भास्कर बंडोपंत गोवंडे (आप्पा), सावंतवाडी/देवराष्ट्रे – ₹11,000/-
कै. आत्माराम विष्णु अळवणी (आपुकाका), भटवाडी, सावंतवाडी
कै. शैलजा आत्माराम अळवणी (काकू), भटवाडी, सावंतवाडी
कै. प्रशांत आत्माराम अळवणी, भटवाडी, सावंतवाडी – ₹17,000/-
एकूण रक्कम : ₹50,000/- (अक्षरी पन्नास हजार रुपये फक्त)
सामाजिक कार्यासाठी दिलेल्या या मोलाच्या सहकार्याबद्दल सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानतर्फे दात्यांचे मनःपूर्वक आभार.
