*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*श्रीराम नवमी*
अवध पुरी
जन्मे श्रीहरि
रामावतार
या पृथेवरी
चैत्राचा मास
बहरे खास
निसर्ग फुले
हो स्वागतास
इंदुकलेने
बाललीलेने
वाढले बाळ
उब मायेने
कोदंड धारी
तो मनोहारी
कृपा कटाक्षे
दु:ख निवारी
सत्य वचनी
हा एकपत्नी
आदर्श पती
हा त्रिभुवनी
सुवर्ण लंका
नसावी शंका
रावण वध
रामाचा डंका.
श्रीराम नाम
सफल काम
सकल जना
उद्धरी राम
सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर
मो.नं7020757854
