You are currently viewing महाराष्ट्र दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते

महाराष्ट्र दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते

सिंधुदुर्गनगरी

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 व्या वर्धापन दिनाच्या ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ रविवार दिनांक 1 मे 2022 रोजी सकाळी 8 वाजता पोलीस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्गनगरी येथे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा  जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.

             या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, विविध संस्था, माध्यम प्रतिनिधी, शासकीय अधिकारी/ कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. तसेच कोविड-19च्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या सर्व सूचनांचे पालन करावे. सामाजिक अंतर याबाबतच्या सर्व नियम पाळणे बंधनकारक राहील.

मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ सकाळी 8 वाजता असल्यामुळे इतर शासकीय कार्यालये व संस्थांनी आपल्या कार्यालयात ध्वजारोणाचा कार्यक्रम सकाळी 7.15 च्या पूर्वी किंवा सकाळी 9 नंतर करावा ,असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − eleven =