You are currently viewing कवितेच्या गावा

कवितेच्या गावा

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. कविता किरण वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कवितेच्या गावा* 

 

जाऊ कवितेच्या गावा

पडे दु:खाचा विसर

कल्पनेने भिजवते

शब्द पावसाची सर

 

वाचकांना पुस्तकाची

जिथे सहल असते

कवितेच्या गावामध्ये

मन अलवार रमते

 

चिंतामुक्त करणारे

कवितांचे असे गाव

फक्त त्यालाच दिसते

भावनांचे छान नाव

 

जेव्हा मनात करते

आनंदाचा छान धावा

चला जाऊया आपण

कवितेच्या अशा गावा

 

सौ कविता किरण वालावलकर

दावणगिरी कर्नाटक

प्रतिक्रिया व्यक्त करा