You are currently viewing कणकवलीत २४ मार्चला भव्य ‘खरेदीदार-विक्रेता’ संमेलन…

कणकवलीत २४ मार्चला भव्य ‘खरेदीदार-विक्रेता’ संमेलन…

कणकवलीत २४ मार्चला भव्य ‘खरेदीदार-विक्रेता’ संमेलन…

कृषी विभाग करणार करार; काजू, कोकम, आंबा उत्पादकांना मिळणार “मार्केट”…

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यातील काजू, कोकम, आंबा आणि फणस यांसारख्या स्थानिक उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागातर्फे मंगळवारी, २४ मार्चला कणकवली कॉलेज येथे भव्य ‘खरेदीदार-विक्रेता’ संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत होणाऱ्या या संमेलनाचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील नवउद्योजक, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि सूक्ष्म उद्योगांना थेट मोठ्या खरेदीदारांशी जोडून देणे हा आहे.

​हे संमेलन सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत पार पडणार असून, दुपारी ३ ते ६ या वेळेत खरेदीदार आणि विक्रेते यांच्यात प्रत्यक्ष व्यावसायिक करार केले जाणार आहेत. या निमित्ताने जिल्ह्यातील प्रक्रियादार आणि शेतकऱ्यांना आपली उत्पादने नामांकित कंपन्या आणि मोठ्या रिटेलर्ससमोर मांडण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

​संमेलनात केवळ बाजारपेठच नाही, तर मार्केटिंग आणि पॅकेजिंग यांसारख्या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्रेही आयोजित करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी गट आणि अन्न प्रक्रियादारांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या व्यवसायाचा विस्तार करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा