शास्त्रीय व वारकरी संगीत परीक्षा अभ्यासक्रमाची भारतीय संगीत कलापीठ केंद्राची श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाला संलग्नता
डॉ.दादा परब आणि बुवा श्री भालचंद्र केळुसकर संचलित श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. सिंधुदुर्गातून विद्यालयाचे पखवाज प्रशिक्षक पखवाज अलंकार श्री महेश सावंत यांनी शास्त्रीय व वारकरी संगीत परीक्षा अभ्यासक्रमाची भारतीय संगीत कलापीठ केंद्राची श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाला संलग्नता मिळवली आहे, कुडाळ-आंदुर्ले येथे केंद्र मान्यता मिळाली आहे.
यामध्ये वार्षिक एक परीक्षा प्रमाणे एकूण पाच परीक्षा होतील (मृदंग प्रथमा ते मृदंग विशारद) अशा परीक्षा होतील तसेच संगीत विषयाच्या वारकरी संप्रदायिक अभ्यासक्रमाप्रमाणे होणार आहेत यामध्ये लेखी परीक्षा(पेपर)नसेल,अत्यंत सुलभ असा अभ्यासक्रमाच्या तोंडी आणि क्रीयात्मक परीक्षा होतील व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना याचे बहुमोल असे प्रमाणपत्र देण्यात येईल ज्याचा उपयोग शासनाच्या विविध योजनांसाठी अत्यंत परिणामकारक असे हे प्रमाणपत्र असेल तरी इच्छुकांनी नक्कीच याचा लाभ घ्यावा आणि कलापीठाच्या परीक्षा फॉर्म भरण्यासाठी संपर्क करावा असे आवाहन श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे. परीक्षा फॉर्म व परीक्षा फी पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने भरले जातील सध्या फक्त शेवटचे आठ दिवस परीक्षा फॉर्म साठी शिल्लक राहिले आहेत जर कुणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या सत्रात परीक्षेला बसायचे असेल अशा विद्यार्थ्यांनी फोन किंवा व्हाट्स अप द्वारे संपर्क करावा.
अधिक संपर्कासाठी
श्री महेश विठ्ठल सावंत मो.call-9420307336/व्हाटस अप-8805891575