*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।।श्री स्वामी समर्थ काव्य वंदना काव्यपुष्प- ६७ वे.
श्री स्वामी भ्रमणगाथा (मोहोळ)..
__________________________
।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
___________________________
श्री स्वामींचे वास्तव मोहळात असतांना
योगाभ्यासी गवेस्वामी भेटे श्रीस्वामींना
श्री स्वामी महाराजांनी आज्ञा केली ती
म्हणे गवेस्वामींना,सोडा योगाभ्यास,
करावी धारण सहज देहस्थिती….
पुढे श्री स्वामी अक्कलकोटास गेले
त्यानंतर काही दिवसांनी,हे गवेस्वामी
मोहोळ -गावी समाधिस्थ हो झाले …
मोहोळ गावी एक शिल्पकार होता
घेई दर्शन स्वामींचे, मग करी भोजन
असा याचा नित्य-नेमच होता
चार महिने हा नियम अखंड सुरू होता…
एकदा हा शिल्पकार,स्वामींना म्हणे
माझे कुलदैवत,मल्हारीमार्तंड आहे
व्हावे दर्शन त्या शिवाचे,ही इच्छा आहे
स्वामी बोले- तू एकचित होऊनि पाहे ..
हात जोडोनि स्वामींसमोर उभा राहिला
शिवदर्शनाची प्रार्थना तो करू लागला
तस्वामींनी इच्छित ते दर्शन त्यास घडविले
उद्धारावे मज आता, शिल्पकाराने विनविले..
आमचे भजन,पूजन करावे,सत्कर्म करावे
सर्वांभूती सदभाव,तेणे होईल उद्धार तुझा
आशीर्वाद हा स्वामी त्यास देते जाहले…
_________________________
करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास
___________________________
कवी अरुणदास” अरुण वि.देशपांडे- पुणे
___________________________
