You are currently viewing भटवाडीतील NAB नेत्र रुग्णालयास सिव्हिल सर्जन डॉ. एस. एच. पाटील यांची सदिच्छा भेट

भटवाडीतील NAB नेत्र रुग्णालयास सिव्हिल सर्जन डॉ. एस. एच. पाटील यांची सदिच्छा भेट

भटवाडीतील NAB नेत्र रुग्णालयास सिव्हिल सर्जन डॉ. एस. एच. पाटील यांची सदिच्छा भेट

सावंतवाडी

भटवाडी, सावंतवाडी येथील NAB नेत्र रुग्णालयास सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन डॉ. एस. एच. पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील अत्याधुनिक सुविधा, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर तसेच ऑप्थाल्मिक व्हॅनची पाहणी केली.
रुग्णालयात उपलब्ध असलेल्या आधुनिक यंत्रणा आणि सेवा पाहून समाधान वाटल्याचे सांगत, NAB सिंधुदुर्गतर्फे राबविण्यात येणारे सामाजिक कार्य अत्यंत उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषतः गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना या सेवांचा मोठा लाभ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या भेटीदरम्यान सिव्हिल हॉस्पिटलचे अधिकारी अँड दिमाख धुरी, डॉ. मधु साळी, NAB नेत्र रुग्णालयाचे टेक्निकल तज्ञ संतोष कदम, सौ. दिपाली कदम तसेच श्री. अनंत उचगावकर उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. पाटील यांचे स्वागत करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा