मिशन लक्षवेध विभागीय स्पोर्टस एक्सलन्स सेंटर प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य व विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभाग यांच्याद्वारा प्रथम टप्यात मिशन लक्षवेध अंतर्गत कोल्हापूर येथे शूटींग व कूस्ती व सांगली येथे रोईंग अशा खेळांचे विभागीय स्तरावर स्पोर्टस एक्सलन्स सेंटर सूरु करण्यात येणार आहेत.
प्रत्येक खेळासाठी २० खेळाडूंची निवड करण्यात येणार असून यासाठी राज्य स्तरावर प्राविण्य प्राप्त व राष्ट्रीय स्तरावरील सहभागी खेळाडू तसेच दि. ३१ डिसेंबर २०२६ रोजी वय २५ वर्ष आतील असणे आवश्यक आहे, अशी किमाण अर्हता असून मागील २ वर्षातील कामगिरीचे मुल्यमापन करण्यात येईल तसेच क्रीडा कौशल्य व शारीरिक क्षमता चाचण्या घेवून प्रशिक्षणार्थींची निवड अंतिम करण्यात येणार आहे.
विभागीय स्तरावार स्पोर्टस एक्सलन्स सेंटर मध्ये होणाऱ्या खेळाडूंना निवास, भोजन, गणवेश व प्रशिक्षण, तज्ञ मार्गदर्शक इ. सुविधा पुरविण्यात येणार आहेत. यावरील खर्च शासनाद्वारे करण्यात येणार आहे. तरी अर्हता धारक खेळाडूंनी अर्ज दि. २४ मार्च २०२६ रोजी पर्यंत विभागीय उपसंचालक क्रीडा व युवक सेवा छत्रपती संभाजी महाराज स्टेडियम, रेसकोर्स नाका संभाजी नगर कोल्हापूर फोन ०२३१-२९५११०८, येथे प्रत्यक्ष अथवा dydkop@gmil.com या ई-मेलवर मुदतीत अर्ज सादर करावेत असे आवाहन कोल्हापूर विभागीय उपसंचालक सुहास पाटील, यांनी केले आहे.
