प्रा.वैभव खानोलकर यांच्यानिबंधाची राष्ट्रीय स्तरावर निवड
सावंतवाडी प्रातिनिधी
कला व विज्ञान महाविद्यालय खुर्दा, अमरावती वरिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय वेबनार जुन महिन्यात आयोजित केले होते. यात विविध विषय देऊन निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन केले होते यामध्ये प्रा. वैभव खानोलकर यांनी “तरुणाच्या आत्महत्या कारण आणि उपाय ” या विषयावर निंबध सादर केला होता. महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, अभ्यासकानी यात सहभाग घेतला होता यातुन प्रा. खानोलकर यांच्या या निंबधाची राज्य स्तरावरुन राष्ट्रीय स्तरावर निवड झाली असुन याबद्दल त्यांचा ई प्रमाणपत्र व विशेष भेटवस्तु देवुन गौरव केला जाणार आहे. प्रा.वैभव खानोलकर हे नेमळे पंचक्रोशी विद्यालयात उच्च माध्य. विनाअनुदानीत विभागात आणि न्यू इग्लिश स्कूल उभादांडा, वेंगुर्ला या दोन विद्यालयात अध्यापन करतात,याच सोबत उत्कृष्ट निवेदक आणि युवा वक्ता म्हणुन ही त्यांची ओळख आहे. सिंधुदुर्गाची मानबिंदु असणारी दशावतार या लोककलेच्या माध्यमातून त्यांनी आता पर्यत अनेक शोधनिंबध, आणि दशावतारी लोककलावंताचे व्यक्तीचित्रण केले असुन एक अभ्यासु व्यक्तीमत्व आणि उपक्रमशील अध्यापक म्हणुनही ते महाराष्ट्रातील विविध शासकीय संस्था, सामाजिक मंडळे, त्यानी ही त्याना विविध पुरस्कार नी सन्मानीत केले आहे. प्रा.खानोलकर यांच्या या निबंधाची राष्ट्रीय स्तरावर झालेल्या निवडीबद्दल त्याचे विशेष कौतुक होत आहे.