You are currently viewing क्रिकेटच्या मैदानावर अनोखा वाढदिवस साजरा – के. के. परब यांना खास शुभेच्छा

क्रिकेटच्या मैदानावर अनोखा वाढदिवस साजरा – के. के. परब यांना खास शुभेच्छा

क्रिकेटच्या मैदानावर अनोखा वाढदिवस साजरा – के. के. परब यांना खास शुभेच्छा

कणकवली

वागदे गावचे अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात क्रिकेटच्या माध्यमातून सर्वांच्या परिचयाचे असलेले के. के. परब यांचा वाढदिवस अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. समाजकार्याची आवड आणि निस्वार्थी वृत्ती यामुळे ओळखले जाणारे परब हे प्रत्येक छोट्या-मोठ्या प्रसंगात मदतीला धावून जाणारे म्हणून सर्वांच्या मनात विशेष स्थान मिळवून आहेत.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवाराने थेट क्रिकेटच्या मैदानावर जाऊन त्यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन आश्चर्याचा आनंद दिला. यावेळी उपस्थित सर्वांनी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.
या अनोख्या सेलिब्रेशनमुळे मैदानावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. के. के. परब यांनीही सर्वांचे आभार मानत, पुढेही समाजासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा