You are currently viewing वेंगुर्ल्यात फाल्गुनी अमावस्येनिमित्त धर्मवीर संभाजी महाराजांची मुकपद यात्रा 

वेंगुर्ल्यात फाल्गुनी अमावस्येनिमित्त धर्मवीर संभाजी महाराजांची मुकपद यात्रा 

वेंगुर्ल्यात फाल्गुनी अमावस्येनिमित्त धर्मवीर संभाजी महाराजांची मुकपद यात्रा

सायंकाळी ६ वाजता माणिकचौक येथून यात्रेला सुरुवात

वेंगुर्ला :

धर्मवीर बलिदान मासानिमित्त फाल्गुनी अमावस्येच्या अंतिम दिवशी धर्मवीर श्री संभाजी महाराज यांच्या स्मरणार्थ मुकपद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा पारंपरिक अंतयात्रेच्या स्वरूपात निघणार असून शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
ही मुकपद यात्रा बुधवार, दिनांक १८ मार्च रोजी सायंकाळी ६.०० वाजता माणिकचौक, वेंगुर्ला येथून सुरू होणार आहे. धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाद्वारे त्यांच्या शौर्य, त्याग आणि धर्मनिष्ठेची आठवण जागवली जाणार आहे.
यात्रेदरम्यान शिस्त व शांतता राखून सहभाग नोंदवावा, असेही आयोजकांनी आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा