*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*उभी ठाकतेस येऊन स्वप्नात*
सहजच हसून लावतेस जीव
हास्यही असते कसे निर्मळ
झुळुझुळु वहातो छान झरा
क्षणात भरून घेतो ओंजळ…..1
आनंदाची साखर पेरणी
विचार देते साधी चारोळी
हास्य लाघवी लावते वाट
लिहाव्या लागती चार ओळी….2
असो समय तो कोणताही
सुचते कविता होता दर्शन
जादू आहे आपल्या हास्यात
लिहावे लागतात शब्द दोन……3
आहे कोणती प्रसन्न देवता
सांगून टाक *पटकन नाव*
देऊन प्रसाद गुळ खोब-याचा
दुनियेत सर्व होईल *नाव*…….4
स्वप्नात सुध्दा येतो चेहेरा
करीत बसतो कविता *छान*
म्हणतो गाऊन दाखविन तुला
तेवढ्यात पावतेस तू अंतर्धान….5
करतोय परतफेड गतजन्माची
सांगून गेली *सटवी कानात*
विषय निघता तुझा *मनात*
*उभी ठाकतेस येऊन स्वप्नात*
विनायक जोशी🖋️ ठाणे
मीलनध्वनी/9324324157
