You are currently viewing महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे (महाराष्ट्र) संस्थे तर्फे पारंपारिक लोकगीतांचा जागर
Oplus_16908288

महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे (महाराष्ट्र) संस्थे तर्फे पारंपारिक लोकगीतांचा जागर

पुणे :

होलिका उत्सवाचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे या वर्षीही पुणे येथील उद्यानप्रसाद प्रसादाच्या सभागृहात महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे (महाराष्ट्र) या संस्थे तर्फे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म.जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख पाहुणे म्हणून लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था सातारा या संस्थेचे अध्यक्ष, मसाप पुणे चे कार्यवाह, साहित्यिक मा. शिरीष चिटणीस (सातारकर) तसेच मोडीतज्ञ सौ.राधिका दाते यांच्या उपस्थितीत हा पारंपरिक लोकगीतांचा कार्यक्रम अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण उत्साहाने संपन्न झाला.

या प्रसंगी संस्थेचे मा. अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक, भावकवी वि.ग.सातपुते, कार्याध्यक्ष मा. नगरसेवक काकासाहेब चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. एम. बी. महेंद्र ठाकूरदास, कोषाध्यक्ष मकरंद घाणेकर, यशवंत देव, ऋचा कर्वे, वंदना घाणेकर, प्रा. डॉ. प्रदीप सांगळे पुणे विद्यापीठ तसेच महाकवी कालिदास प्रतिष्ठानच्या कार्यकारिणीचे मान्यवर उपस्थित होते.

डॉ. ठाकूरदास सरांनी प्रास्ताविक करुन या कार्यक्रमाचा उद्देश सांगितला.

संस्थेचे विद्यमान कार्याध्यक्ष मा. काकासाहेब चव्हाण यांची पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवड झाली त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

पुणे परिसरातील सुमारे ६५ विद्यमान कवी आणि कवयत्री यांनी आपल्या लोकगीतातील भारुड, गवळण, देवीची स्तुती , भक्तिगीते, पोवाडा, अभंग, भजन, कीर्तन, नाट्यगीत, भलरी, भावगीत, सुगम संगीत अशा विविध प्रकारच्या पारंपरिक गीतांचे अत्यंत उत्तम सुरेल असे सादरीकरण केले.

तितीक्षाच्या प्रिया दामले यांनी पारंपारिक वेशभूषेत सवाद्य भारुड सादर केले.

उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात या अशा भारतीय लोककलांचे जतन करणे अत्यंत गरजेचे असून ही कलासंस्कृती आपल्या पुढच्या पिढीसाठी पुढे नेणे आणि या कला आवर्जून जपणे किती महत्वाचे आहे हे आपल्या भाषणातून विषद केले. या अशा कलात्मक उपक्रमातून प्राचीन कालापासून सामाजिक प्रबोधन घडविले आहे..हा इतिहास आहे. तेंव्हा अशा या कला आपणही जपणे महत्वाचे आहे हे सांगितले.

भारतीय संस्कृती ही मानवी मूल्ये जपून जीवनाचे परिपूर्ण संगोपन करून सार्थक कसे होईल याचा अशा कलासंस्कृती मधून आदर्श निर्माण करीत असते तेंव्हा या सर्व कला जपण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे असे सुचविले गेले.

प्रतिक्रिया व्यक्त करा