You are currently viewing गझलपुष्प संस्थेतर्फे प्रा. सुरेखा कटारिया यांचा विशेष सन्मान

गझलपुष्प संस्थेतर्फे प्रा. सुरेखा कटारिया यांचा विशेष सन्मान

निगडी, प्राधिकरण -(15 मार्च 2026)

गझलपुष्प कला साहित्य सांस्कृतिक सामाजिक संस्था आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या कर्तृत्वान महिलांचा सन्मान सोहळा कॅप्टन कदम सभागृह निगडी येथे रविवार दिनांक 15 मार्च 2026 रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक शोभा जोशी यांच्या हस्ते सामाजिक क्षेत्रात, खास करून महिला सक्षमीकरणासाठी सदोदित कार्यरत असणाऱ्या समाजसेविका प्रा. सुरेखा कटारिया यांचा गझलपुष्प तर्फे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या वतीने हा पुरस्कार त्यांचे सुपुत्र श्रेयश कटारिया यांनी स्वीकारला. या प्रसंगी व्यासपीठावर गझलपुष्प संस्थेचे अध्यक्ष संदीप जाधव, गझलपुष्प चे ज्येष्ठ सल्लागार नंदकुमार मुरडे उपस्थित होते. या पुरस्काराचा मी माझ्या आईच्या वतीने मोठ्या आनंदाने स्वीकार करत असल्याच्या भावना श्रेयश कटारिया यांनी व्यक्त केले.

या सोहळ्यात पिंपरी चिंचवड मधील साहित्यिक महिलांचाही सन्मान करण्यात आला. त्यामध्ये माधुरी डिसोझा, माधुरी विधाटे, रजनी अहेरराव, सीमा गांधी, सुमन दुबे, विनिता पिसाळ, प्रतिमा काळे, डॉ. सीमा निकम, योगिता कोठेकर, उज्ज्वला केळकर, शामला पंडित, वर्षा बालगोपाल या साहित्यिक भगिनींचा सन्मान करण्यात आला.

या सन्मान सोहळ्यानंतर अविस्मरणीय महिला मराठी गझल मुशायरा संपन्न झाला. एक से बढकर एक मराठी गझला यामध्ये सहभागी महिला गझलकारांनी सादर केल्या. सरोज चौधरी, मीना शिंदे, सुमन दुबे, सारिका माकोडे, नयन गोवंडे या महिला गझलकारांनी मुशायरा गाजवला व रसिकांनी त्यांना वाह.. क्या बात है अशी उस्फुर्त दाद दिली. या सोहळ्यासाठी ज्येष्ठ कवी सुरेश कंक, ज्येष्ठ गझलकार चंद्रकांत धस, ज्येष्ठ साहित्यिक बाबू डिसोझा, कवी अशोक वाघमारे, कवी आत्माराम हारे व रसिक श्रोते आवर्जून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोषाध्यक्ष अभिजीत काळे यांनी केले तर पुरस्कार सोहळ्याचे निवेदन सारिका माकोडे यांनी तर गझल मुशायऱ्याचे निवेदन अविनाश घोंगटे यांनी केले. हा सोहळा उत्कृष्ट रित्या पार पडण्यासाठी दिनेश भोसले, प्रशांत पोरे, गणेश भुते, निलेश शेंबेकर, आदेश कोळेकर, हेमंत जोशी, सुहास घुमरे यांनी सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा