You are currently viewing युगंधरा

युगंधरा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी प्रो. डॉ.जी. आर. उर्फ प्रवीण जोशी लिखित अप्रतिम लेख*

*युगंधरा*

अनादी अनंत किती युगे किती वर्षे लोटली तरी मी आजतागायत आहे तशीच आहे . कीती उन्हाळी, कीती पावसाळी , कीती ऋतु माझ्या पाद स्पर्शाने तुडवली ती मलाच माहीत ! पण मी आहे तशीच आहे तिथंच आहे !
परिवर्तने बरीच झाली, किती तरी युगे काळ रात्रीत गप्प झाली , पण माझा मूळ रूप हा स्थायी भाव झाला आहे आणी तो तसाच
राहणार ही काळ्या दगडावरची रेघ !
मी कुठे नाही ? जगात कुठल्याही प्रांतात जा मी असणारच . तिन्ही काळ अष्टौप्रहर माझं अस्तित्व आहेच की . माझ्या शिवाय ह्या जगाचे सुद्धा पान इकडचे तिकडे होणार नाही
देवादिकांच्या काळापासून माझं अस्तित्व मी पुढे पुढे नेत आहे . त्यांच पण सदैव साकडं माझ्या पुढे च! मी त्यांना बऱ्याच वेळा उद्धरीत केलं . आज पण मीच सर्व मानव च काय
सर्व प्राणी पशु पक्षी जीवजंतु श्रुष्टी तील सर्व घटकावर माझीच नजर असते .
मला कोण आदिमाता म्हणतात, तर कोणी मोहमाया , तर कोणी आदिशक्ती , तर कोणी प्रकृती ! माझं कार्य हे मी कधीच बदलेल नाही बदलणार नाही हे त्रिवार सत्य .
मी च ती सृजनशील शक्ती . मी श्रुष्टी ! मी धरा!
मी मेदिनी मी च पृथा ! मी माता, मी अनेक प्रकारची माती मी स्त्री , मी प्रजनन करणारी . पालन ,पोषण संगोपन , मी जीव श्रुष्टी निर्माती , मी माता ते मी माती पुर्णस्वरूप जगत्रय जननी ! विश्व दर्शन !
हो पण माझ्या काही सवयी आहेत, त्या मी पुर्ण करून घेण्यासाठी सर्व काही क्लुप्त्या वापरते .
कोण नाही हो मी ? ऋतु नुसार माझे रूप पालटले जातात . मी प्रत्येक ऋतूत निराळीच असते . माझं सौंदर्य हेच माझं अस्त्र , माझ्या शिवाय तुमच्या जगण्यात पूर्णत्व येत नाही !
मी साज शृंगारा शिवाय राहू शकत नाही . मी च तर करणार ना , तो माझा निसर्गदत्त अधिकार ! मी अवखळ कन्या , तरुणी , कल्याणी, प्रेमिका , मी भार्या, मी च ती , सर्व हट्ट पुरवुन घेणारी तो ही अगदी सहज पणे !
मी साज , मी दागिना, नटणे , लाजणे , मुरडणे , नखरा करणे मनमुरादपणे हौस करून घेणारी . स्वर्गातील अप्सरा रंभा मेनका उर्वशी ह्या माझेच पूर्वज ना !
मी च सांख्य तत्वाची प्रकृती ! जड, अचेतन त्रिगुणात्मक , मोहमयी , गुढ , आगम्य , सर्वव्यापी, बीजस्वरूप कारण, मी सर्वत्र एकच आहे ! स्वतंत्र स्वयंभु पण निष्क्रिय !
मी कोण ! अस का वाटत तुम्हाला मी फुलात , पानात, फळात आहेच की.
विविधात्मक रंगाच्या आकाराची, फुले त्यांचं विविध गंध, वर्ण त्यांची झळाळी , हिरव्यागार झाडात वेलीत , त्यांचं मनमोहक रूप , तरीपण निष्क्रिय !
माझे अस्तीत्व मृदुमुलायम स्पर्शात , कोकिळेच्या कंठात , पौर्णिमेच्या शीतल चांदण्यात , गायीच्या हंबरण्यात , मयुर केकात मयुर पीस .
आजचे माझे अस्तित्व, काळानुसार जरी सुधारले असले तरी , मी सगळीकडे आहेच की , माझा पोशाख माझं राहणीमान माझ्यातल
परिवर्तनाचा च भाग आहे .
मुळात माझ्याकडे निसर्गाने जी दैवी शक्ती दिली आहे, तीच आदिशक्तीचे अधिष्ठान आहे
म्हणूनच देवादिकांच्या पासुन ते आजच्या मानवापर्यंत माझी स्तुती चालत आली आहे .
दुर्गे दुर्घटभरी तुझं वीण संसारी त
अनाथ नाथे आंबे करुणा विस्तारी
वारी वारी जन्म मरणा ते वारी
हरी पडलो आता संकट निवारी

प्रो डॉ जी आर उर्फ प्रवीण जोशी
अंकली बेळगाव
कॉपी राईट
सेल नंबर 9164557779

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा