धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त रेडी येथे रक्तदान व मोफत नेत्र तपासणी शिबीर
रेडी
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त रेडी येथे रक्तदान शिबीर व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दुर्गरक्षक प्रतिष्ठान रेडी (शिवप्रेमी यशवंतगड), माऊली युवा प्रतिष्ठान आणि मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
सोमवार दिनांक १६ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत ग्रामपंचायत रेडी सभागृह, व्यासपीठ येथे हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध असणार असून, केवळ ₹१८० मध्ये चष्मेही उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
सध्याच्या काळात विविध शस्त्रक्रिया व उपचारांसाठी रक्ताची गरज भासत असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून एखाद्याचे प्राण वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
तसेच नेत्र तपासणी शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना कमी किमतीत दर्जेदार चष्मे उपलब्ध होणार असल्याने परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असेही आयोजकांनी सांगितले आहे.
