*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*भाव असावा अपार…!*
सुर जगण्याचे
ईश्वरा तू शिकविलै
भाव उमटले
नितळ…
दिव्य मोहामध्ये
रममाण झाली सृष्टी
मनुजन्मास पुष्टी
मिळाली…
दोन जीवांमध्ये
शब्दाविण संवाद चाले
प्रेमभावाची फुले
फुलुनीया…
कोण भरतो
जगण्यासाठी ते सस्य
ओठी हास्य
निरागस…
असे जगावे
नित्य भक्तीभावे झोकून
जावे वाकून
नम्रतेने…
साधना,आराधनेत
भाव असावा अपार
होते पार
जीवननौका…
सौ.प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®
