राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर दाखल गुन्ह्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता
ऍड. अशपाक शेख यांच्या यशस्वी युक्तिवाद
कणकवली
कणकवली पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्रमांक ०१३३ / २०२३ अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या मारहाण व गोंधळाच्या गुन्ह्यातील आरोपींची कणकवली येथील मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. एस. जी. लटुरिया साहेब यांनी निर्दोष मुक्तता केली.
फिर्यादी गवस हमीद बोबडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक १२/०५/२०२३ रोजी रात्री नांदगाव तिठा येथे वडापाव स्टॉलच्या कारणावरून आरोपींनी शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम १४३, १४७, ३२३, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर प्रकरणात न्यायालयाने एकूण ०७ साक्षीदारांची तपासणी केली. तथापि, आरोपींविरुद्ध कोणताही ठोस व सबळ पुरावा सिद्ध न झाल्याने तसेच दोन्ही पक्षांमध्ये पूर्वीपासून राजकीय वाद असल्याचे आढळून आल्याने मा. न्यायालयाने दिनांक १३/०३/२०२६ रोजी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
सदर प्रकरणात आरोपींच्या वतीने अॅड. अशपाक शेख यांनी काम पाहिले असून अॅड. पराग नार्वेकर, अॅड. शिवानी जुवेकर, अॅड. नामदेव मठकर, अॅड. पंकज खरवडे, अॅड. विनय रजपूत, अॅड. कैस शेख व ॲड. भूषण कदम यांनी सहकार्य केले.
