वेंगुर्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते ॲड. जी. जी. टांककर यांच्या हस्ते कार्यक्रम; पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले शहरातील राऊळवाडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते ॲड. जी. जी. टांककर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संदीप पेडणेकर, जिल्हा सचिव सुशील चमनकर, ॲड. मनीष सातार्डेकर, तालुका सरचिटणीस संदीप सातार्डेकर, तालुका सचिव सचिन कोंडये, ओबीसी उपाध्यक्ष चंद्रशेखर मांजरेकर, माजी उपसरपंच गणपत केळुस्कर, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मोठे, माजी सरपंच सौ. नेहा अन्सुरकर, ज्ञानेश्वर अन्सुरकर, तातोबा नार्वेकर, श्याम नवार, तालुका युवा अध्यक्ष गजानन कुंभार, स्वागत कवठणकर, श्रेयस टाककर, राजेंद्र आंब्रे, सचिन पेडणेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नवीन कार्यालयाच्या माध्यमातून पक्षाचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कार्य केले जाईल, असा विश्वास यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
